Bhigwan Crime : पुणे सोलापूर हायवेवर अपघात झाला ; अन अपघातग्रस्त कार गाडीत मिळाले गोमांस,भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भिगवण पोलीस ठाण्याच्या हददीत रात्रगस्त व चेकिंग डयुटी चालू असताना डायल नंबर ११२ नंबरवरुन पुणे सोलापुर हायवेवर अपघात अपघात झाल्याची माहिती मिळाली,त्याठिकाणी जात पाहणी केली असता, गाडीमध्ये जनावरांच्या मांसाचे तुकडे आढळून आल्याने कारचालक अहमद इब्राहिम खान वय.२७ वर्षे ( रा.एच.एम,कापरे, सर्व्हे नं.१४९,साऊथ गेट,मगरपट्टा हडपसर पुणे ) याला ताब्यात घेतले असून,सुमारे अंदाजे २५ हजार किंमतीचे २२५ किलो गोमांस आणि चार लाख किंमतीची टॉयटो कंपनीची जीप असा ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार निश्चल बाळासाहेब शितोळे यांनी फिर्याद दिली असून,संशयित आरोपीवर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२९,महाराष्ट्र प्राणी संरक्षण ( सुधारणा ) अधिनियम १९९५ चे कलम ५ (क),९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस फौजदार शितोळे व पोलीस कर्मचारी हे रात्रगस्त व चेकिंग ड्युटीला असताना डायल ११२ नंबरवरून पुणे-सोलापूर हायवेला अपघात झाल्याची माहिती मिळाली असता,भिगवण पोलीस तात्काळ त्याठिकाणी गेले असता हायवे रोडच्या डिव्हायडरवर लाल रंगांची जीप नंबर ( एम.एच.१२ बीजी ५७५२ ) ही गाडी सोलापूर -पुणे हायडे रोडने पुण्याकडे जात असताना,मध्य डिव्हायडर वरून जात अपघात झाला होता.गाडीची पाहणी केली असता,गाडीमध्ये जनावरांच्या मांसाचे मोठंमोठे तुकडे मिळून आले. पोलिसांनी गाडीला क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेत, चालकाचा शोध घेतला असता,चालक अहमद खान हा भिगवण बस स्थानकावर मिळुन आला.

त्याच्याकडे चौकशी केली असता,इंदापूर येथून जनावरांचे कत्तल केलेले गोमांसाचे तुकडे भरून ते विक्री करिता घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले.हे गोमांस गाई,वासरे,बैल या जनावरांचे कत्तल केलेले गोमांस असल्याचे चालकाने कबूल केले. गाडीमध्ये एकूण २५ हजार किंमतीचे २२५ किलो वजनाचे गोमांस व ४ लाख किंमतीची टॉयटो किंमतीची जीप असा तब्बल ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल भिगवण पोलिसांनी हस्तगत केला असून,या गोमांसा मधून ५०० ग्रॅम वजनाचे गोमांस हे पशुधन विकास अधिकारी यांच्या मदतीने सॅम्पल काढून हेमा केमीकल अनोलायझर यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून,बाकीचे गोमांस सीलबंद केले आहे.असे फिर्यादीत म्हंटले आहे.याबाबत भिगवण पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *