मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आला होत. मात्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर कायम स्वरूपी पोलीस महासंचालकांची नियुक्ती करावी,अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती.त्यानंतर हायकोर्टाने सरकारला फटकारंल होतं. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत.गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी सभाळलेली आहे.
विद्यमान पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे या
पदाची तात्पुरती जबाबदारी होती.संजय पांडे हे वरिष्ठ
आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल २०२१ पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे.मात्र पांडे यांना या पदावरून हटविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे अॅड.दत्ता माने यांनी केली होती.
पोलिस महासंचालक हे पद सर्वोच्च असून त्याच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया असते.यानुसार राज्यातील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात.त्यातून अंतिम नावांची शिफारस महासंचालक पदासाठी केली जाते.त्यातून पूर्णवेळ महासंचालक नियुक्ती केली जाते. ही प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे.यातील अंतिम तीन
पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हेमंत नागराळे,के.व्यंकटेशम आणि रजनीश सेठ यांचा समावेश आहे,असे याचिकेत स्पष्ट केलं होतं.त्यानंतर आता यातून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.