Political Breaking : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर,भर सभेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन तब्बल दोन वर्षे होऊन गेली,असे असताना देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले,भर सभेत दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री म्हणून माजी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा उल्लेख केला आहे.जेव्हा स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मात्र त्यांनी आपली चूक सुधारली.

इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवकाध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज्यमंत्री भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून आले. चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली.

त्यानंतर दत्तामामांनीही आपली चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला.मात्र, दत्तामामा यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये मात्र हशा पिकला. तेव्हा भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होतं असं कधीकधी, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती असताना,देखील त्यांना मुख्यमंत्र्याच्या नावाचा विसर पडला.यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा मात्र सुरू झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *