Anna Hazare : तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही,जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची वाईन विक्रीवरून सरकारवर जोरदार टीका..!!


उद्यापासून अण्णांच्या प्राणांतिक उपोषणाला सुरुवात..

महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वाईन बाबत जो निर्णय झाला होता की,सुपर मार्केट आणि किराणा दुकानात सुद्धा वाईन विक्रीला परवानगी मिळणार आहे. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.तुम्ही जनतेचे आहात,मालक नाही.त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे.तुम्ही मनमानी कशी करू शकता ? असा थेट सवाल अण्णा हजारेंनी उपस्थितीत केला.तसेच वाईनही आपली संस्कृती नाही.आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का ? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता ?

तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का ? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे.त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही,असे उदगार अण्णा हजारे यांनी काढलं आहे.तसेच उद्यापासून अमरण उपोषण करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी काल अण्णा हजारे यांच्याशी वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत चर्चा केल्यानंतर अण्णा हजारे यांनी ग्रामसभा बोलावली.यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.महाराष्ट्रात दारू कमी आहे ?

बीयर बारचे दुकाने आहेत ना,परमिट रुमही आहेत.वाईन शॉपीचे दुकानेही आहेत.त्यात वाईन मिळते ना ? एवढी दुकाने असताना आणखी का ठेवता ? सर्व लोकांना व्यसानाधिन करायचं आहे का ? लोक व्यसनाधीन झाले की आपल्याला जे साधायचं ते साधून घ्यायचं असा काही डाव आहे का ? युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही बालकं आमची संपत्ती आहे.ही बालकं व्यसनाधीन झाली तर काय होणार ? असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *