महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मालाड रेल्वेस्थानक परिसरात लोकलमध्ये हेडफोन्स आणि अन्य सामग्री विकणाऱ्या २५ वर्षीय अंध मुलीवर नराधमांनी बलात्कार करत तिचा मोबाइल पळवून नेला असून,याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तिघां अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोटात दुखू लागल्याने कुरकुंभ येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेली असल्याने,तेव्हा ती गर्भवती असल्याचे तिला समजले. यात मालाड रेल्वे स्थानकावर महिन्यांपूर्वी पीडित मुलीवर अनोळखी व्यक्तीने बलात्कार केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार करमाळा तालुक्यातील व सध्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ पांढरेवाडी परिसरात राहणारी ही पीडित मुलगी ही लोकलमध्ये मोबाइल हेडफोन्स आणि अन्य सामग्री विकायची.पीडित युवती ही जन्मतः अंध असून,ही युवती ऑक्टोबर २०२१ रोजी उल्हासनगर स्थानकावरून मालाड येथील रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर प्लॅटफॉर्म नं.२ येथे हेडफोन्स विकून थांबली असता ( वेळ तारीख माहीत नाही ) त्या दिवशी रात्री अचानकपणे अनोळखी इसमांनी तिचे तोंड दाबत हाताला धरून बाजूला घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला.त्यावेळी अज्ञात इसम हे हिंदीत बोलत होते.परंतु पीडित युवती घाबरलेली असल्याने ते काय बोलत होते,हे तिला समजून आले नाही.त्यानंतर त्या नराधमांनी पीडितेच्या जवळ असलेले कागदपत्र,मोबाईल,पर्स घेत तेथून पळ काढला.
या प्रकारानंतर ही युवती घाबरलेली असल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.त्यानंतर ती पांढरेवाडी येथे आली आणि तीला कुरकुंभ येथील कंपनीत काम मिळाले.अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने व तिची मासिक पाळी वेळेवर न आल्याने ती कुरकुंभ येथील सरकारी रुग्णालयात गेली असता डॉक्टरांनी तिला तपासून ती गरोदर असल्याचे सांगितले.त्यानंतर तिने घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला.या युवतीच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी तिघां अज्ञात इसमांनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.