महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पंढरपूर मार्गे चंदन घेऊन जाणार्या एका वाहनाला ताब्यात घेऊन ८ लाख २८ हजार रुपयांचे १३८ किलो चंदन व ७ लाख रुपयांची गाडी असा १५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, ही कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांनी केली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पेनुरहद्दीतून पंढरपुर मार्गे चंदन घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिस नाईक हनुमंत उर्फ समाधान भराटे यांना मिळाली होती.
त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.वरिष्ठांनी तत्काळ एक पथक संबंधीत वाहन पकडण्यासाठी पाठवले.या पथकाने सापळा रचून एम.एच.४२ के ७६११ या क्रमांकाचे गाडी पकडली.या गाडीमध्ये चार पोती भरून चंदनाचे लाकूड मिळून आले. तसेच या गाडीमध्ये चालक रमेश महादेव तेलंग,वय.२५ ( रा.तूंगत,ता. पंढरपूर ) व कचरूद्दीन अल्लामीन जमादार,वय.३५ ( रां. पेनुर,ता.मोहळ) हे मिळून आले. हे चंदनाचे लाकूड कोठून आणले होते,कोठे नेण्यात येणार होते,याचा तपास करण्याचे काम पोलिस करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशीकांत ओलेकर,पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमाळे,प्रकाश मोरे,पंढरीनाथ गोदे,पोलिस नाईक विनायक यजगर,गजानन माळी, हनुमंत उर्फ समाधान भराटे,देवेंद्र सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे.