Crime News : घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..!!


वालचंदनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत सणसर येथे फिर्यादी संभाजी शिवाजी आडके ( रा. सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे ) यांच्या घराची घरफोडी झाली होती,त्यानुसार तपास करीत असताना,या गुन्ह्यातील संशयित आरोपी नियोजन उर्फ बेरड्या संदीप भोसले ( रा.सोनगाव,ता.बारामती, जि.पुणे ) याला ताब्यात घेतले असून हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार लखन ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) सोबत केला आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की,सणसर येथे घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत असताना,त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही घरफोडी नियोजन उर्फ बेरड्या भोसले यांनी केली असून,तो बारामती सोनगाव रोडला येणार असल्याचे समजले असता, सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या घरफोडी मध्ये चोरीस गेलेला एमआय कंपनीचा मोबाईल मिळून आला.त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आणखीन चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आले.

हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार लखन सोबत केला असल्याचे सांगितले.त्याच्या ताब्यात असलेले मोबाईल आणि आरोपीला पुढील तपास कमी वालचंदनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.तपासा दरम्यान संशयित आरोपी नियोजन उर्फ बेरड्या संदीप भोसले याच्यावर यापूर्वी बारामती शहर पोलिस ठाण्यात भा.द.वि ३७९,३८०,४५४,४५७,३८० सारखे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस अंमलदार सचिन घाडगे,आसिफ शेख,अजय घुले,विजय कांचन,राजु मोमिन पोलीस नाईक अभिजित एकशिंगे स्वप्नील अहिवळे,पोलीस कर्मचारी धिरज जाधव, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस उपनिरीक्षक निकम , पोलिस हवालदार पाटमास पोलीस नाईक स्वामी यांनी केली आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *