महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या साडे चार लाखांच्या बदल्यात मुद्दलेच्या तिप्पट पैसे द्यायला तयार असूनही मला सव्वीस लाख दे,एवढं होऊन देखील सव्वीस लाख द्यायला तयार झालेल्या फिर्यादी रविंद्र हरिभाऊ काळे, वय.३५ वर्षे ( रा.गुणवरे ता.फलटण,जि. सातारा ) यांनी माझी जमीन फिरवून माझ्या नावावर करून दे मात्र माजलेल्या खासगी सावकार ज्योतीराम संभाजी गावडे ( रा.गुणवरे,ता. फलटण,जि.सातारा ) याने तब्बल ४४ लाख दे अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या खासगी सावकांराविरुद्ध भा.द.वि कलम ५०६,महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीनुसार,काळे यांनी सन २०११ मध्ये मुलीच्या लग्नाकरीता संशयित खासगी सावकार जोतिराम गावडे याच्यांकडुन साडे चार लाख रुपये १० टक्के व्याजदराने घेतले होते.त्यावेळी तारण म्हणून गुणवरे गावातील गट नं.११९१ मधील दोन एकर जमीन खुषखरेदीपत्राने करून दिली होती.या कर्जातील मुद्दल आणि त्यावरील व्याज फेडल्यास दोन एकर जमीन माझ्या नावावर पुन्हा करुन देणार असल्याचे त्यावेळी ठरले होते.साधारण दीड वर्षानंतर काळे हे गावडे यांच्याकडे जात,सर्व पैसे एकरकमी रक्कम देतो व माझी जमीन मला फिरवुन द्या”असे म्हणाले असता,त्यावेळी त्याने मुद्दल आणि व्याज असे एकूण २६ लाख एवढी रक्कम मागितली.
म्हणजे १८ महिन्यांमध्ये कर्जाच्या मुद्दलेच्या तिप्पट पैसे द्यायला तयार होऊनही,खासगी सावकार गावडे याने मुद्दल आणि व्याजाचे २६ लाख रुपये होते.आता ४४ लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील, नाहीतर तुमची जमीन तुम्हाला परत देणार नाही.तसेच यापुढे माझ्याकडे जमीन मागायला आल्यास जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली आहे.असे फिर्यादीत म्हणटंले आहे.याबाबत आधीक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. अरगडे हे करीत आहेत.