Crime News : वाद जमिनीचा अन,गुन्हा ३५३ चा…यवत पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की..!!


यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

यवत पोलिस ठाण्याच्या आवारात जमिनीच्या वादावरून मोठ मोठ्याने गोंधळ करत बोलत असताना,यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अजिंक्य दिलीप दौंडकर हे मोठ्याने आवाज करून नका असे सांगायला गेले असता,तू पोलीस असला म्हणून आमचा वाद मिटवणार का ? असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केल्याप्रकरणी दादा किसन टेळे,धुळा किसन टेळे ( दोन्ही रा.टेळेवाडी,ता.दौंड,जि. पुणे ) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.द.वि कलम ३५३,३३२ (३४) प्रमाणे यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक अजिंक्य दौंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,दि.२६ जानेवारी रोजी यवत पोलीस ठाण्याच्या आवारात दोघेजण मोठंमोठ्या आवाजाने बोलून गोंधळ करीत होते.म्हणुन पोलीस कर्मचारी दौंडकर यांनी तुम्ही मोठमोठयाने ओरडु नका,तुमची काही तक्रार असेल ती ठाणे अंमलदार यांच्याकडे दया,असे बोलले असता,त्यांच्यातील एक जण मला म्हणाला की तु कोण मला सांगणारा ? तु पोलीस असला म्हणजे काय झाले ? तु आमचा वाद मिटवणार का ? तुला काय केस करायची ती कर आम्ही बघतो आम्ही येरवडा जेलमध्ये बसतो असे म्हणत वाद घालत, मला धक्काबुकी केली,तसेच त्याच्याबरोबर उभा असलेल्या दुस-याने माझ्या शर्टची कॉलर धरुन तु त्या माणसाला अटक कर नंतर माझे सोबत बोल अशी अरेरावेची भाषा बोलत,सरकारी कामात अडथळा केला.त्यावेळी तेथे हजर असलेल्या पोलीस कर्मचारी जगताप,क्षीरसागर, यादव यांनी दोघांना ताब्यात घेतले असे फिर्यादीत म्हटंले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *