यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे – सोलापुर महामार्गाशेजारीच असलेले यवत ता.दौंड येथील महाराष्ट्र बँकचे एटीएम चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडले असल्याची घटना घडली,असून घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले आहे.यवत पोलिसांच्या वतीने तपास चालू आहे.गेलेल्या रक्कमेबाबत अधिक माहिती मिळाली असून,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,पोलिस निरिक्षक नारायण पवार घटना स्थळी दाखल झाले आहेत.
रात्री साधारण अडीच ते तीन च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २३ लाख ८१ हजार ७०० रुपये लंपास केले आहेत.एटीएम ठेकेदार विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असुन,गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता चोरटे दोन दुचाकीवर आल्याचे दिसत असुन तपासा साठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक नागरगोजे करत आहे.