पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
उपमुख्यमंत्री अजित पवार कधी कार्यकर्त्यांवर हक्क बजावताना,तर कधी स्पष्ट वक्तेपणाने चर्चेत असतात. असाच काहीसा प्रकार आज घडला आहे. पुण्यात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना दादांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने सर्वत्र एक वेगळीच चर्चा होऊ लागली आहे. राज्याच्या नागरिकांच्या जीवाशी खेळून कोणीच चालणार नाही.आरोग्य हे पाहिलं चांगलं ठेवावं लागेल.राज्यात वाढती कोरोना संख्या लक्षात घेता, रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढल्यास राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे हे निर्णय घेतील,असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.