Breaking News : झारगडवाडी गावच्या सरपंच निवडीत काही पॅनल प्रमुखांनी आर्थिक तडजोड केल्याची ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू..!!


पॅनल प्रमुखांनी दुसऱ्यांदा सरपंच पदाचा दिलेला शब्द न पाळल्याने ग्रामपंचायत सदस्यांने नाराजी व्यक्त करीत दिला राजीनामा..

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज…

बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यकाल संपलेल्या सरपंच निवडीवरून सदस्य आणि पॅनल प्रमुखांमध्ये फलटणमधील हॉटेल जित पॅराडाईजमध्ये मोठी खडाजंगी झाली.ग्रामपंचायत झारगडवाडी सरपंच निवडीच्या आदल्या दिवशी नऊ सदस्य, पदाधिकारी,पॅनलचे कार्यकर्ते असे जवळपास तीस जण हे देवदर्शन करून फलटणच्या हॉटेल जित पॅराडाईज मध्ये मुक्कामी होते.त्यावेळी पॅनल प्रमुख आणि सदस्यांत सरपंच निवडीवरून खडाजंगी झाली. यात दुसऱ्या वेळी सरपंच पद देण्याचा शब्द न पाळल्याने आणि विश्वासघात केल्याने सदस्य अजित बोरकर यांनी पॅनल प्रमुखाकडे आपल्या सदस्य पदांचा राजीनामा दिला.

झारगडवाडी येथील सरपंचाचा कार्यकाल हा प्रत्येकी नऊ महिन्यांचा ठरवण्यात आला होता मात्र पहिल्यांदा झालेल्या सरपंचांनी वेळेत राजीनामा न दिल्याने सरपंच निवड ही काही महिने पुढे गेली.यामुळे काही सदस्य नाराज होते.त्यात पहिल्या सरपंचांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता काम केल्याचा ठपका देखील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत काही सदस्य यांनी मांडला.पॅनल प्रमुख नारायण कोळेकर,दयाराम महाडिक,पोपट निकम,राजेंद्र बोरकर,सुखदेव निकम,आप्पासो साळुंके,रमेश बोरकर,सतीश कुलाळ,नितीन मासाळ,आणि इतर सदस्यांमध्ये सरपंच पदावरून फलटण येथील हॉटेल जित पॅराडाईज याठिकाणी रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत सरपंच पदावर चर्चा झाली या चर्चेदरम्यान सदस्य आणि पॅनेल प्रमुखांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

याअगोदरच्या आणि आता झालेल्या सरपंच निवडीत काही पॅनल प्रमुखांनी आर्थिक तडजोड करीत पद दिल्याची चर्चा झारगडवाडी ग्रामस्थांमध्ये जोरदार सुरू समोर येऊ लागली आहे.कदाचित यामुळेच पॅनल प्रमुखांनी माझ्या नावाला कट मारला असावा.यासर्व घडामोडी मुळे आणि दुसऱ्यांदा सरपंच पदाचा दिलेला शब्द न पाळल्याने आज मंगळवारी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याचे अजित बोरकर यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *