मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात नेहमीच खटके उघडत असतात.दोन्ही नेते सध्या कट्टर राजकीय विरोधक आहेत.त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.मात्र यावेळी वादा मागील कारण वेगळे असून गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे.तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी मराठा विद्या प्रसारक संस्था वादाच्या प्रकरणावरुन पोलिसांकडून तपास सुरु असून महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु असल्याच्या भीतीपोटी त्यांना कोरोना झाला का ? अशी खरमरीत टीका महाजनांवर केली होती.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी म्हटले की,खडसेंना ठाण्यात ट्रिटमेंटची गरज आहे. आणि पुन्हा एकदा खडसे आणि महाजन शाब्दिक वर सुरू झाला असून,खडसे यांनी पुन्हा एकदा महाजन यांना उत्तर देताना, महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल,अशा शब्दात खडसेंनी टोला लगावला आहे.खडसे म्हणाले, नाथाभाऊंना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही.पण गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवले पाहिजे.