इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील कुरेशी गल्ली येथील शब्बीर कुरेशी यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत अज्ञात इसमांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या २ लहान वासरांना व ४ जर्सी गायांना ताब्यात घेत ५० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, पोलीस कर्मचारी लक्ष्मण साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमांनवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ११,५ (अ),५ (ब),९,९ (ब) कायद्यानव्ये इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,इंदापूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,कुरेशी गल्ली येथे कत्तलीच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवली आहेत.व दररोज जनावरांची कत्तल होऊन पुणे परिसरात गोमांस पाठविले जाते अशी माहिती मिळाली असता, कुरेशी गल्ली येथे गेल्यावर शब्बीर कुरेशी याच्या राहत्या घरा शेजारील मोकळ्या जागेत अज्ञात इसमांनी कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली २ लहान व ४ जर्सी गायी बांधलेली आढळून आली.या जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाणी न देता डांबून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आली.या जनावरांना नीरा नरसिंग गोशाळा याठिकाणी पोहोच करण्यात आले आहे याबाबत अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.