बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
केंद्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी देशातील प्रबोधनकार महापुरुषांच्या यादीतून नाव वगळून आण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल अवमानकारक,आक्षेपार्ह भाषा वापरली असून या घटनेचा बारामती शहरात मातंग समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.शोषित वंचित घटकांचा आवाज आपल्या शब्दांतून मांडणारे,३५ कादंबऱ्या १४ लोकनाट्य ,१० पोवाडे, १३ कथासंग्रह, ७ चित्रपट कथा, १ प्रवासवर्णन लिहून जे साहित्यिक झाले.संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल अवमानकारक भाषा वावरणाऱ्या त्रिवेदी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्रातील मातंग समाजाकडून होत केली जात आहे.
यावेळी “आण्णा भाऊ आपके सन्मान मे…मातंग समाज मैदान मे ,केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध अशी घोषणाबाजी देखील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मातंग समाजातील धडाडीचे नेतृत्व सोमनाथ पाटोळे यांनी राज्य सरकारने आण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा अहवाल केंद्राकडे उशिरा पाठवला म्हणून ही वेळ आलेली आहे.त्यामुळे हे दोन्ही सरकार मातंग समाजासाठी उपयुक्त नाही असा आरोप पाटोळे यांनी सरकारवर केला.या निषेधाचे निवेदन बारामती तहसीलचे अधिकारी सय्यद यांना देण्यात आले.यावेळी विजय खरात, बिरजु मांढरे,केदार पाटोळे,राहुल खरात,अजय खरात,विजय नेटके,ऍड अमृत नेटके,सागर जाधव,संजय भोसले,राजू मांढरे, सुनील शिंदे,साधू बल्लाळ,किरण बोराटे व मातंग समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.