Breaking News : शिवभोजन थाळीतील भ्रष्टाचार आता रोखला जाणार… शिवभोजन थाळी केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार.!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी शिवभोजन थाळ्यांच्या वाटपामध्ये केंद्र चालकांकडून खोट्या नोंदी लावून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप केला होता.शिवभोजन थाळी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व घोटाळा होत असल्याचा आरोप देखील केला होता.आणि याच अनुषंगाने आता असे गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला असून,राज्यातील सर्व शिव भोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाला काढले असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवभोजन थाळी केंद्रावर एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप फडणवीस यांच्यासह चित्रा वाघ यांनी देखील मुंबईत झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात केला होता.शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी व भोजन योजना सुरू केली असून, शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत भ्रष्टाचार असून हा महाराजांचा अपमान असल्याचे सांगून फडणीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे विधिमंडळात तीन तेरा वाजवले होते.यामुळे आता शिवभोजन थाळीचे प्रत्यक्षात किती लोकांनी जेवण केला आहे हे समोर यावं यासाठी ज्या ज्या ठिकाणी शिवभोजन थाळीची केंद्रे आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक सणार आहे असा आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाला सरकारकडून देण्यात आला आहे.

यामुळे आता शिव भोजन थाळी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा ची करडी नजर असणार आहे. त्यामुळे आता विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिवभोजन केंद्रावर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत की नाही याची तपासणी करून कारवाई करावी शिवभोजन केंद्राचे देयक देताना तक्रार आल्यास,सीसीटीव्ही फुटेज तपासणीत अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी तक्रारीवर अंतिम आदेश येईपर्यंत सीसीटीवी फुटेज गहाळ होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तसेच सरकारच्या निर्देशानुसार शिवभोजन थाळी खाद्यपदार्थ मिळतात का ? पिण्याचे पाणी स्वच्छ आहे का ? हेही यानिमित्ताने तपासता येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *