बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहराचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यावर झालेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणावर भाजपाचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकरांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करत,या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी कोणावरही कारवाई केलेली दिसून येत नाही या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर का कारवाई केली नाही ? असा सवाल देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.यामध्ये जर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे दोषी नव्हते,तर त्यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली ? असा सवाल देखील पडळकर यांनी उपस्थित केला.
या प्रकरणावर भाष्य करताना पडळकर म्हणाले की,बारामती शहराचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचे नाव संताचे असून यांनी केलेले काम हे काळीमा फासणारे आहे. या प्रकरणावर विविध न्यूज चॅनेल व पेपरमध्ये बातम्या प्रसारित झालेल्या असून अद्यापही या प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून झालेले दिसून येत नाही.या प्रकरणातील पीडीत युवती न्याय मागण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे गेली असता माझ्यावरती अन्याय झालाय,मला न्याय द्या.आणि पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी ते प्रकरण लगेच गुंडाळून टाकले आणि कुणाला तरी फोन करत तिला मॅनेज करून टाका आणि हा विषय संपून टाका.यामागे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे काय गौडबंगाल आहे,हे मात्र समजले नाही.असा घणाघाती आरोप पडळकरांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यावर केला.
एका पोलीस निरीक्षकाबरोबर असा प्रकार घडतोय हे फार क्लेशदायक असून,या प्रकरणात या पीडितेचा मित्र होता असे पेपर मध्ये आलेले आहे.हे जर खरं असेल,जर हनी ट्रॅप केला असेल तर त्या युवतीवर का गुन्हा दाखल केला नाही ? आणि जर या युवतीवर पोलीस निरीक्षकांकडून अत्याचार झाले असतील तर,त्या पोलीस निरीक्षकांवर का गुन्हा दाखल केला नाही.आणि हे सभापती महोदयांमार्फत मी गृहमत्र्यांकडे सवाल उपस्थित करत आहे.असे असताना त्याची दोन दिवसात बदली ला करण्यात आली,तो जर चुकीचा नाही, गुन्हेगार नाही त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला नाही.त्याची बदली करण्यात आली.म्हणजे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना माहीत होतं की तो चुकीच्या प्रकरणात आहे.आणि या प्रकरणांमध्ये तुमच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जाणार,म्हणून तुम्ही या विषयावर गप्प बसताय,चुप्प बसतांय या विषयांवरती काही बोलत नाही असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्र्यांवर व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांवर निशाणा साधला