बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेन्सिल चौक येथे (दि.२६ डिसें ) रोजी व्हीआयपी बंदोबस्त करीत असताना, दारूच्या नशेत वेडी वाकडी गाडी चालवणाऱ्या यशपाल महादेव गावडे,वय.३० वर्ष(रा.गुणवडी,ता.बारामती,जि.पुणे) याच्यावर पोलीस कर्मचारी भुलेश्वर मरळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार वाहन कायदा कलम १९८८ चे १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,
बारामती पेन्सिल चौक येथे व्हीआयपी बंदोबस्त करत असताना एमआयडीसी जळोची रोडकडे जाणारी सियाज गाडी क्र.MH. ४२ AH १७१७ ही डायनामिक्स कॉलनी समोर वेडीवाकडी चालवित असताना मिळुन आल्याने त्याला थांबवुन चौकशी करत असताना,तो बोबडे बोलताना दिसून आल्याने त्याच्या तोंडाचा वास घेतला असता त्याच्या तोंडाचा उग्र वास येत होता त्याला विचारले असता,त्याने दारु पिल्याचे कबूल केले.त्याला ताब्यात घेत,महिला हॉस्पीटल येथे वैद्यकीय तपासणी केली असता,त्याने दारू प्यायल्याचे दिसून आल्याने त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.