महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
कोरोना काळात शासकीय सेवेसेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली होती. या उमेदवारांचा सहानुभूतीपुर्वक विचार करत महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाची वाढीव मुदत दिली आहे.१७ डिसेंबर रोजी यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मार्च २०२० जाहिराती प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. या तारखेपासून ते शासन निर्णयाच्या (१७ डिसेंबर २०२१) दिनांकापर्यंतच्या काळावधीत ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा सर्वांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुभा देण्यात आली आहे.
३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील,त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.