Big Breaking : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई,आठ ठिकाणी सर्च ऑपरेशन करत केले तब्बल १३ कोटींचे ड्रग्ज हस्तगत..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

मुंबई झोनच्या (NCB) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस ड्रग्ज तस्करीचं रॅकेट उघडकीस करत
कारवाई केली आहे.या कारवाईत तब्बल १३ कोटींचे ड्रग्जचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.ड्रग्जची तस्करी चक्क कुरिअरच्या माध्यमातून तस्करी असल्याचे या कारवाईत समोर आलं आहे.या कारवाईत हार्ड डिस्क,मायक्रोवेव्ह अव्हन, सायकलिंग,स्टेथस्कोप या माध्यमातून देखील अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे या कारवाईत उघडकीस आल आहे. जवळपास आठ ठिकाणी कारवाई करत,या प्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अनेक टीमचं गेल्या दोन दिवसांपासून सतत धाड सत्र सुरु असून होत.
संशय निर्माण होऊ नये,यासाठी स्टेथस्कोप सारख्या वस्तू वापरल्या होत्या.खोटी ओळख बनवून खोटा पत्त्यांवर अंमली पदार्थ हवाई मार्गे पाठवले जात होते.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी परदेशात होणाऱ्या पार्टीसाठी हे अंमली पदार्थ पुरवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश एनसीबीने केला आहे.या कारवाईत एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले असून आणखी काही जण या टोळीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारवाईत एनसीबी ने ४.९ ग्रॅम मेटाफेटामाईन – डॉक्टर स्टेथस्कोपमध्ये ४ किलो अफीम मायक्रोवेव्ह अव्हनमधून मालदीवला पाठवलं जात होतं २.५ किलो झोपीडीयम १० हजार टॅब्लेट खाण्याच्या पदार्थात अमेरिकेत पाठवण्यात येत होत्या.४.९५ ग्रॅम एमफेटमाईन, सायकल हेल्मेटमध्ये आणि ४.५६ ग्रॅम बांगड्यांमधून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते.८.४८ ग्रॅम मेटाफेटामाईन हॉर्स पाईपमध्ये लपवून दुबईला पाठवलं जाणार होतं,हे डोंगरीमधून जप्त करण्यात आले
आहे.३.९ ग्रॅम एमफेटाईम टाय बॉक्समधून सीएसएमटी
येथून जप्त केलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *