मोठी बातमी : तब्बल २५ हजार गायी,आणि एक हजार म्हशींची सुटका करणारा गोवंश संरक्षक २७ वर्षीय तरुण पहा कोण आहे तो तरुण ??


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षी तब्बल २५ हजारांहून अधिक गायीची सुटका आणि एक हजार म्हशींची सुटका करणारा गोवंश गोसरंक्षक तरुण म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई जवळील उजनी येथील शिवशंकर राजेंद्र स्वामी हा तडफदार तरुण युवक होय.६०० हून अधिक कसायांवर गुन्हे दाखल करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका,कित्येक वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न,जीवे मारण्यासाठी आठ कोटींची सुपारी ही सगळी कहाणी चित्रपटातील नसून गोवंश वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या एका युवा गोरक्षकाची आहे.

स्वामी यांनी पुण्यातील पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण तर स्वरूपवर्धिनी संस्थेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.दहा बाय दहाच्या भाड्याच्या घरात बालपण गेले.या दरम्यान,घरची परिस्थिती फार नाजूक होती,अशातच स्वामी हे मिलिंद एकबोटे यांच्याकडे नोकरी करू लागले.एकदा एकबोटे यांचे कार्यकर्ते गायींची सुटका करण्यासाठी चाकण परिसरात निघाले असता स्वामी देखील त्यांच्यासोबत निघाले.लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच चाकण बाजारात कत्तलीसाठी जाणाऱ्या २९ गायींचा ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडला.याच घटनेनंतर स्वामी यांना गोरक्षणाची आवड निर्माण झाली आणि सुरू झाला एक स्तब्ध करणारा धाडसी प्रवास…वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी स्वामी यांनी पूर्णवेळ गोरक्षणासाठी स्वतःला वाहून घेत आपल्या कार्याला सुरूवात केली. त्यांच्या आई-वडीलांनीही पूर्ण पाठिंबा दिला.

पुणे,सातारा,सोलापूर,अहमदनगरपेरणे फाटा यांसारख्या अनेक ठिकाणी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.मात्र,तरीही त्यांनी माघार घेतली नाही.२०१७ साली श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वामी यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला गेला. काष्टी येथे कत्तलीसाठी जाणारा १२ बैलांचा टेम्पो स्वामी यांनी पकडला.यासंदर्भात गुन्हा दाखल करत असताना १०० जण त्यांचा नमाज संपल्यानंतर पोलीस ठाण्यात जमा होऊन शिवीगाळ धमक्या देऊ लागले.नंतर झालेल्या मारामारीत स्वामी यांचे चार सहकारी गंभीर जखमी झाले.यातील एकाला अजूनही बोलता येत नाही.त्यावेळी कार्यकर्त्यांचे कवच आणि पोलिसांमुळे स्वामी बचावले.तीन महिन्यापूर्वी अहमदनगरहून कोर्टाच्या सुनावणीनंतर स्वामी पुण्याला परतत असताना त्यांना जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो आढळला.
कसायांना ही गोष्ट समजली.

त्यानंतर त्यांनी स्वामींच्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरूवात केली.आणेघाट ते आळेफाटा अशा २५ किलोमीटरच्या अंतरादरम्यान अगदी फिल्मी स्टाईलने स्वामींच्या चालत्या गाडीवर कोयते,धारदार तलवारी,काठ्यांनी हल्ला झाला आळेफाटा पोलीस ठाण्यात स्वामी आल्यानंतर पुन्हा
तिथेही हाणामारी झाली.यानंतर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.तसेच २०१९ साली बारामतीत रोज एक हजाराहून अधिक गायींची कत्तल करून ते मांस व्हिएतनाम,दुबई या देशांत पाठवले जायचे.स्वामी यांनी धाड टाकल्यानंतर १२ कोटी रूपयांचे ५५ टन गोमांस,७५ गायींना जिवंत पकडलं.सतत होणारे हल्ले पाहता स्वामी यांना २०१५ नंतर २४ तास पोलीस संरक्षण पुरविण्यात आले.दिवसा आणि रात्री प्रत्येकी तीन सशस्त्र पोलीस त्यांच्यासोबत असत.नंतर मात्र,सरकार बदललं आणि कसायांच्या तक्रारीनंतर त्यांचे संरक्षण काढून त्यांना आता केवळ पुणे ग्रामीण हद्दीत दोन सशस्त्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे.

२०११ साली स्वामी यांना राज्यशासनातर्फे मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत २५ हजारहून अधिक गायींची सुटका करून ६०० पेक्षा जास्त कसायांवर गुन्हे दाखल केले आहेत.गायी पकडल्यानंतर स्वामी त्यांना सरकारमान्य गोशाळेत पाठवतात संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात एकही गाय,बैल कापला जाणार नाही,असा ध्यास घेतलेल्या आणि जीवावर उदार होऊन गोवंशाचे संरक्षण करणारा हा गोवंश गोरक्षक त्यांच्या या कार्याला सलाम….!!!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *