बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामतीमध्ये फेरफटका मारण्यासाठी आलेल्या भिगवण येथील हॉटेल निसर्गच्या कामगारांना मारहाण करणाऱ्या सराईत आरोपी बालाजी अनिल माने,वय.२० वर्ष ( रा.नेवसे रोड, बारामती ),प्रतीक दिलीप रेडे,वय.२० वर्ष,(रा.बारामती ) शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपी बालाजी माने हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचे तपासात दिसून आले.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,भिगवण येथील हॉटेल निसर्ग मधील कामगार काम संपल्यानंतर रात्री साडेबारा वाजता भिगवन वरून बारामती रोडला फेरफटका मारण्यास निघाले. बारामती येथे कोर्टासमोर आल्यानंतर त्यांना दोघांनी, अडवत हत्याराचा धाक दाखवत पैशाची मागणी केली.परंतु ते वेटर असल्याने त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते, त्यामुळे आरोपींनी तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली असता त्यातील दोन जण पळून गेले त्यातील पवन कुमार प्रथम लाल, वय.२२ वर्ष,(रा.मुळ उत्तराखंड ) याला दोघांनी पकडून ठेवत त्याच्या कडे असणारी गाडी क्र. एम.एच.१६ एक्यू ३२९५ घेत पवन कुमार यांला एका तालमीत दोराने खांबाला बांधून ठेवले व त्याला सोडवण्यासाठी इतर पळून गेलेल्या दोघांकडून पैसे मागून घेण्यास त्याला सांगितले.
परंतु त्याच्याकडे कोणाचाही नंबर नसल्याने तो काहीही करू शकत नसल्याने आरोपींनी त्याला दोन-तीन तास दमून ठेवल्यानंतर आरोपींना डोळा लागताच पवन कुमार हा नजर चुकवून त्याने दोर सोडत तेथून पळ काढत,मालकाकडे घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने,रेकॉर्डवरील आरोपीचे फोटो दाखवला असता,बालाजी माने याला त्यांनी ओळखले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत प्रतीक रेडे यांच्यासोबत गुन्हा केल्याचे कबूल केले.आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी बंडू कोठे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण,अजित राऊत सचिन कोकणे यांनी केलेली आहे.