बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करंजेपुल पोलीस चौकीच्या हददीतील गावातील जलसिंचन विद्युत पंप चोरणाऱ्या टोळीला वडगाव पोलिसांनी गजाआड केले असून सागर सतीश पाटोळे (रा.करंजे,ता.बारामती,जि.पुणे)
शेखर सतिश पाटोळे,मयूर नंदकुमार गायकवाड (सर्वजण रा.करंजे,ता.बारामती,जि.पुणे) एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील सात जलसिंचन विद्युत पंप हस्तगत करण्यात आले आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करंजेपुल पोलीस दूरक्षेत्रात असणाऱ्या करंजे या गावात जलसिंचन विद्युत पंप चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असुन,या अनुषंगाने वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात मोटार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगाने तपास करीत असताना सागर पाटोळे हा आपल्या साथीदारांसह विद्युत पंप चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाले असता पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह १० जलसिंचन विद्युत मोटारी चोरी केल्याचे कबूल केले,पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दहापैकी सात विद्युत मोटारी हस्तगत केल्या असून,उर्वरित तीन मोटारींचा शोध वडगाव निंबाळकर पोलिस घेत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके, पोलीस हवालदार डी.एस.वारुळे, आर.एल.नागटिळक,एन.के. खेडकर,पोलीस नाईक नितीन बोराडे,सागर देशमाने,पोलीस शिपाई महादेव साळुंखे,अमोल भुजबळ यांनी केली आहे.