मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने तीन नावे प्रस्तावित केली आहेत.यामध्ये सध्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांचे नाव नसल्याने त्यांच्या नावावर फुली मारल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी संजय पांडे यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी घेतलेले निर्णय व केलेल्या कामाचा विचार करत पांडे यांनाच या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कायम ठेवावे असा आग्रह राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी धरला आहे.अगदी निस्वार्थीपणे व तळमळीने करणारे भारतातील पाहिले अधिकारी आहेत,अशी चर्चा पोलीस दलात आहे.महाराष्ट्र पोलिसांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा देवदूत आम्ही आमच्या सर्व्हिस मध्ये पहिला नसल्याचे देखील पोलीस कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.
त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी,कर्मचारी अत्यंत अभिमानाने सांगत आहेत,की आमच्या देवदूताला राज्य सरकारने पुनर्विचार करून पोलीस महासंचालकपदी कायम ठेवावे अशी मागणी आता पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना मेल करत केलेली आहे.गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर पांडेसाठी वेगवेगळे ट्रेंड चालविण्यात येत आहेत. राज्यातील पोलिसांनी सोशल मिडियाद्वारे संजय पांडे यांना समर्थन देण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे.अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल करत, विनंती केली असून,या मोहिमेतून राज्यसरकारने पांडे यांना कायम करावे यासाठी आग्रह धरला जात आहे.महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी पोलीस दलासाठी अगदी निस्वार्थीपणे,तळमळीने पोलिसांच्या कल्याणासाठी काम केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने विनंती करत,पांडे यांची महासंचालक पदावर बदली करायची की नाही हा निर्णय आपल्या हातात आहे,मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या भावनेचा आदर व विचार करून करून आपण संजय पांडे यांना सेवानिवृत्त होईपर्यंत महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदावर कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे.सामान्य कर्मचारी असो की वरिष्ठ अधिकारी सामान्य जनता असो की सिव्हिल वरिष्ठ अधिकारी एका व्हाट्सअप मेसेज वर अडचण समजून घेणारे व्यक्तिमत्त्व संजय पांडे यांनाच महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी विराजमान राहू द्यावे,अशी सर्वसामान्य जनतेची व पोलीस अंमलदार यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांना पोलीस दलाकडून विनंती करण्यात आली आहे.