टोळीच्या ताब्यातील गावठी पिस्टल केले हस्तगत..
भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भिगवन पोलिसांनी भिगवण परिसरातील सोनाज HP पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्लॅन उधळून लावत तिघांना ताब्यात घेतले आहे.संदिप आनंद हीरगुडे,वय ३४ वर्षे (रा.हारनस,ता.भोर,जि. पुणे) अनिकेत विलास सुकाळे वय.२३ वर्ष (रा.मूळ,काबरे,ता. भोर,जि.पुणे ) सध्या रा.मारुती मंदिराजवळ रायकरमळा,धायरी पुणे) रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार वय.३३ वर्ष रा.वाकंम्ब,ता.भोर,जि.पुणे ) सध्या (रा.मारुती मंदिराजवळ, रायकरमळा,धायरी,पुणे ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून, याप्रकरणी आरोपींवर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३९९,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,भिगवण परिसरातील सागर हॉटेल जवळ असलेल्या सोनाज HP पेट्रोलपंपावर ४ ते ५ जण दरोडा घालणार आहेत,माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन सापळा रचत तिघांना ताब्यात घेतले असता,त्यांच्या ताब्यातील एक गावठी पिस्टल,पाच जिवंत काडतुसे,एक लोखंडी कटावणी व इतर साहित्य असा एकूण अंदाजे सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत अधिक चौकशी केली असता,त्यांनी सांगितले की,आम्ही व आमचे साथीदार इतर शंभूराज मच्छिंद्र जेधे (रा.आंबवडे,ता.भोर जि.पुणे) पुनित ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) मिळून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,पोलीस अंमलदार रुपेश कदम,इन्कलाब पठाण,समीर करे,आप्पा भंडलकर,रामदास जाधव,सचिन पवार,अंकुश माने,शंकर निंबाळकर,सुभाष मदने पोलिस मित्र रवी काळे,विकास गुनवरे अशोक चोळके यांनी केलेली आहे.