बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज…
बारामती तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना तालुक्यातील धुमाळवाडी मधील रघुनंदन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते.यावेळी त्यांनी “जर तिसरी लाट आली तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशाराही अजित बारामतीकरांना दिला.लसीकरण वाढवण्यासाठी उपक्रम राबवा असाही सल्ला प्रांताधिकारी यांना दिला.लसीकरण झाल्यानंतर, कोरोना जरी झाला तरी माणूस वाचतो.कोरोनाने काही होत नाही असा अति आत्मविश्वास मनातून काढून टाका,असेही अजित पवारांनी आवर्जुन सांगितले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार,म्हणाले की,काल शनिवारी कर्जत जामखेडमध्ये अनेक विकास कामांची उद्घाटने झाली.यावेळी मात्र अजित पवार फार आक्रमक झालेले दिसून आले,कारण कर्जत जामखेड येथे कोणीच करोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून आले,यामध्ये अजित पवारांचे पुतणे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील मास्क वापरला नव्हता.त्यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना म्हटले,”अरे शहाण्या.. तू आमदार आहेस”. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल”.मी भाषण करताना देखील मास्क काढत नाही अन् लोक मास्क वापरत नाहीत,हे बरोबर नाही असा शाब्दिक टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
त्रिपुरा येथील घटनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की,या घटनेनंतर नांदेड,मालेगाव अमरावती या शहरात काही समाज कंटकांमुळे जातीय दंगली उसळल्या.याचाच गैरफायदा घेत काहींनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला..मात्र आपण सर्वांनी आपली परंपरा कायम ठेवत जातीय सलोखा राखला पाहिले असे देखील आवाहन अजित पवारांनी जनतेला केले.