महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी पंढरपूर रोडला गोपीचंद दादा गवळी व त्यांची पत्नी हे दुचाकी वरून पंढरपूर ते सोलापूर मार्गे जाणाऱ्या रस्त्याने अंकोली येथे जात असताना संध्याकाळच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवत त्यांचेकडील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरी करून नेल्याबाबत अज्ञात इसमानविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३९४ (३४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी या गुन्ह्या संदर्भात तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या, या गुन्हयाच्या घटना स्थळास भेट देवुन,तपास सुरू केला.तपासात मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार हा गुन्हा तारापुर ता.पंढरपूर येथील आरोपीनी केल्याचे समजुन आले.
तपासा दरम्यान चार आरोपींना ताब्यात घेतले,असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असल्याने चारही आरोपींना अटक करण्यात आली असून,त्यांच्याकडून गुन्हयात चोरी केलेला मोबाईल दोन मोटार सायकल व सोन्याचे मणी असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या गुन्हयाचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
ही कामगिरी सातारा पोलीस पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक धंनजय पोरे,पोलीस उपनिरीक्षक,अमितसिद पाटील, सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे,पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर,सलीम बागवान, सचिन गायकवाड,सचिन मागाडे,केशव पवार,अंमलदार शरद कदम,शोएब पठाण यांनी केली आहे.