BIG BREAKING : पिळदार शरीर बनवण्यासाठी इंजेक्शन विक्री करणाऱ्या कसब्यातील तरुणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शरीर पिळदार बनवण्यासाठी इंजेक्शनची विक्री करणाऱ्या बारामती कसबा परिसरातील युवक प्रदीप सुरेश सातव,वय.२८ (रा.कसबा,ता.बारामती,जि.पुणे)याला शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील २० इंजेक्शन बॉटल ताब्यात घेत त्याच्यावर औषध निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवी कलम १७५,२७६,३२८,३३६ प्रमाणे बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या ताब्यातील अंदाजे साडे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आजकालच्या तरूण पिढीमध्ये शरीर बनवण्याचे वेढ वाढलेले आहे,त्यासाठी तरुण पिढी काहीही करावयास तयार असते.यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंजेक्शन घेणे, सप्लिमेंट घेणे यासारखे प्रकार केले जातात,मात्र या सगळ्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो.टेलिव्हिजन व चित्रपटामधील हिरोसारखे शरीर बनवण्याचा पण होतो,परंतु त्यामुळे शरीराची खुप मोठया प्रमाणावर हानी होत आहे. मध्यंतरी काही बॉडीबिल्डर लोकाचा जिनमध्ये व्यायाम करताना मृत्यु झाल्याच्या घटना सुदधा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचल्या आहेत आणि त्याचे लोन आता ग्रामीण भागात सुदधा पसरत आहे.यानुसार कसब्यातील युवक प्रदीप सातव हा लोकांना शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विकी करत असल्याची माहिती मिळाली,असता या माहितीच्या आधारे,सापळा रचून त्याला ताब्यात घेत,त्याच्या ताब्यातील हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी क्र.एम.एच.०२ डी.झेड ७२८६ ताब्यात घेत,तपासणी केली असता,गाडीमध्ये इंजेक्शनच्या २० बॉटल मिळुन आल्या.

अधिक तपास केला असता,हे इंजेक्शन सर्जरी केल्यानंतर होणारा त्रास नियंत्रित करण्यासाठी व दुखवटा कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम जेलेनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो.हे औषध शरिरावर दुष्परिणाम करणारे असल्याबाबत औषध निरीक्षक यांनी सांगितले,ही औषधे कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसुन बारामतीमधील जिमला विकले जात असल्याने तात्काळ औषध निरीक्षक यांना बोलावून सदर औषधे ही पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली आहेत.त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,हे औषध कोठून आणली व अजून कोणा-कोणाली विकली आहे. याचा पुढील तपास पोसई गणेश पाटील हे करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके,पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे,अभिजित कांबळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस कर्मचारी बंडू कोठे, अजित राऊत,दशरथ इंगोले, सचिन कोकणे,मनोज पवार यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *