धुळे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
धुळे शहरात बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला धुळे शहर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.त्याच्याकडून त्याच्या ताब्यातील देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत.शुभम सुनील पुंड,वय.२४ वर्ष ( रा.प्लॉट नं.२, लक्ष्मीवाडी,रेल्वे क्रॉसिंग जवळ,शासकीय दूध डेअरी रोड,धुळे असे पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,५/२५ सह महा.पो.कायदा कलम ३७ (१) चे उल्लघंन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिवाळी सणानिर्मीत्त जनतेच्या सुरक्षितेसाठी,अवैध शस्त्र जवळ बाळगुन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना मिळाल्याने,तपास सुरू असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,शुभम पुंड ह्याच्याकडे गावठी बनावटीचा पिस्टल व जिंवत काडतुसे बाळगून आहे.धुळे शहरातील गुन्हे शोध पथकाने मोठया शिताफीने सापळा रचत, धुळ्यातील दसेरा मैदानाजवळ ताब्यात घेत त्याची अंगझडती केली असता,त्याच्याकडे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा २६,०००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आल्याने ह मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस हवालदार व्हि.आर.भामरे करीत आहे.ही कारवाई धुळे शहर पोलीस अधीक्षक प्रविण कुमार पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तसेच शोध पथकाचे पोलीस अंमलदार विलास भामरे,मुक्तार मन्सुरी,पोलीस कर्मचारी निलेश पोतदार,प्रविण पाटील,मनिष सोनगीरे,तुषार मोरे,शाकीर शेख अविनाश कराड यांनी केलेली आहे.