पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
समाज कार्याचा ध्यास आणि माणुसकीचा वसा हातात घेऊन गरजू आणि गरीब लोकांची सेवा करण्याचा युवा उद्योजक तुषार शिंदे यांचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना,सर्व सामान्य लोकांना दिवाळी साजरी करण्याची परिस्थिती राहिली नाही,कारण महागाई व जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत,अशा परिस्थिती मध्ये सामान्य आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांचे कंबरडे मोडले आहे.
अगदी दिवाळी डोक्यावर येऊन ठेपली असताना,दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या मार्गदर्शनाखाली तुषार शिंदे यांनी स्वखर्चातून रुग्णालयातील सफाई कर्मचारी तसेच रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरीब लोकांना दिवाळी निमित्त फराळ वाटप केले,तरुण मुलांना रोजगारासाठी व समाज उपयोगी कामांसाठी सरकार दरबारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार शिंदे वारंवार पाठपुरावा करीत असतात.समाजात खूप लोक श्रीमंत असतात पण समाजसेवा व गरिबांची सेवा करणारे हातावर मोजण्या इतकेच लोक आहेत त्याला अपवाद आहेत ते म्हणजे तुषार भाऊ शिंदे..
कोरोना काळात तुषार भाऊंनी लोकांची केलेली मदत देखील चर्चेचा विषय ठरली असून, कोरोनाच्या काळात लोकांची अवस्था बिकट झालेली असताना,शिर्सुफळ गावचे सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे यांनी गावात मोठया प्रमाणावर गोरगरिबांना किराणा किट वाटप , अन्नदान वाटप,फळे वाटप, इत्यादी कार्यक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.कोरोना काळात रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर असताना,काही तरुणांना मोफत ररक्ताच्या बॅगा देखील तुषार शिंदे यांनी अगदी स्वखर्चाने लोकांना पुरवल्या.