शेटफळगडे येथे गावाच्या सर्वांगीण विकास कामाचे मुद्दे घेत ग्रामसभा संपन्न…!!


शेटफळगडे : सुरज सवाणे ( उपसंपादक महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज )

शेटफळगडे येथे २६/१०/२०२१ रोजी तहकूब झालेली ग्रामसभा आज शेटफळगडे येथील नागेश्वर मंदिर येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.या ग्रामसभेत गावाच्या विकासात्मक विषयासंदर्भात मुख्य विषय घेऊन ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल,गावाच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत,त्या कशा पद्धतीने सोडवता येतील.याबाबतीत सकारात्मक चर्चा देखील झाली.

आपले गाव आपली जबाबदारी,आपली माणसे म्हणून कोरोना लसीकरणात आपले गाव कसे अव्वल राहील,गावाला कोरोनामुक्त पुरस्कार प्रदान होण्यासाठी १०० % गाव कोरोना लसीकरण पूर्ण करणे गरजेचं आहे.हा सुद्धा विषय ग्रामसभेमध्ये मांडला गेला.आपल्या गावातील विकास हा एक प्रकारे भविष्यात आदर्श निर्माण झाला पाहिजे अशी आशा शेटफळगडेचे संतोष वाबळे यांनी व्यक्त केली.गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पाटी काही तरुणांकडून लावण्यात आली होती हा मुद्दा चर्चेचा विषय ग्रामसभेमध्ये झाला,ती पाटी त्या ठिकाणावरून काढून योग्य ठिकाणी लावावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला.

ग्रामसभेत खालील विषयावर चर्चा करण्यात आली.

१) सन २०२२ – २३ चा “आमचा गाव आमचा विकास” आराखडा तयार करणे.
२) कोविड-१९ साठीच्या लसीकरण न झालेल्या महिलांची यादी तयार करून १००% लसीकरणाचे नियोजन करणे.
३) कोरोना मुक्त गाव पुरस्कार योजना बाबत चर्चा करणे.
३) महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन २०२१/२२ चे पुरवणी आराखड्यास मंजुरी देणे.
४) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे सन २०२२/२३ चे समृद्धी लेबर बजेट तयार करणे.
५) प्लास्टिक बंदी बाबत चर्चा करणे.
६) सर्व अपूर्ण विकास कामे १०० दिवसात ( ३० नोव्हेंबर २०२१ पूर्वी ) पूर्ण करणेबाबत चर्चा करणे.
७) मतदान नोंदणी जनजागृती कार्यक्रमाबाबत चर्चा करणे.
८) माझी वसुंधरा अभियान राबविण्याबाबत चर्चा करणे.
९) कर वसुली १००% करणेबाबत नियोजन करणे.
१०) आर्थिक साक्षरता अभियान या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणाची यादी तयार करणे.

यावेळी या ग्रामसभेला संतोष वाबळे,अजित कुंभार, माऊली भोसले,गावचे पोलीस पाटील संभाजी सवाणे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ सवाणे,दत्तात्रय शिरसट असे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच ग्रामसभेत काही ताण तणाव निर्माण होऊ नये यासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *