राहुरी (अहमदनगर) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
आज राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान प्रसंगी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.त्यामुळे,त्यांच्या नावापुढे आता डॉक्टर ही पदवी लागली आहे. पवार यांनी बहुमानासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आभार मानले आहेत.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे “अन्नं बहु कुर्वीत तद् व्रतम” हे ब्रीदवाक्य केवळ दिखाव्यासाठी नको. ही प्रतिज्ञा व्यवहारात आणली पाहिजे.तसा प्रयत्न प्राध्यापक करीत आहेत. विद्यापीठाचे कार्यनप्रेरणादायी आहे. पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार होतेय. याचे समाधान आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत शेतकऱ्यांनी जनतेला अन्नधान्य पुरवून जिवंत ठेवले.शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्कृष्ट शेतमाल तयार करावा.शेतमालाचे जास्तीत जास्त पेटंट केल्यास,निर्यातीतून चौपट उत्पन्न मिळेल.शेतकरी सुखी होईल.आत्महत्या होणार नाहीत.”या प्रसंगी कृषी क्षेत्रातील स्नातकांनी संशोधन कार्यात भाग घ्यावा,आपल्या संशोधनातून देशाचे भले करू असा संकल्प करावा.
अशी अपेक्षा व्यक्त करून,येत्या पाच-सहा वर्षात कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठी मातृभाषेत करण्याचा प्रयत्न असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात कुलपती कोश्यारी बोलत होते.प्रति कुलपती तथा कृषीमंत्री दादा भुसे,माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार,रस्ते बांधकाम व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, महाराणा प्रताप कृषी व अभियांत्रिकी विद्यापीठ, उदयपुर (राजस्थान) कुलगुरु नरेंद्रसिंग राठोड उपस्थित होते.
कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.मी कृतज्ञतापूर्वक या
सन्मानाचा स्वीकार करतो,तसेच देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं,त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले. शरद पवार यांचे कृषी क्षेत्रासाठी मोठं योगदान आहे,बारामती ऍग्रो उभारण्यातही त्यांना मोठा वाटा आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी सातत्याने नाविण्यापूर्व प्रयोग केले आहेत.
शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रासाठी योगदानाची दखल घेऊनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे, त्यामुळेच शरद पवारांना शेतकऱ्यांचा नेता असेही संबोधले जाते.आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शेती संदर्भातील विविध समित्या आणि खात्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे.विशेष म्हणजे देशाचे कृषीमंत्री म्हणूनही त्यांनी १० वर्षे काम केलंय.देशातील शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी त्यांच्याच काळात मिळाली होती.शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय
ऐतिहास होता,असेही त्यांनी यापूर्वी एका भाषणात सांगतिले होते.