डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी सुरूच…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शोध (डीबी) पथकाने घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.बारामती परिसरातील सुर्यनगरी,तांदूळवाडी,वंजारवाडी या परिसरात त्याच्या आणखी दोन साथीदारांसह त्याने घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे.गुन्हे शोध पथकाने आरोपी संजय देविदास भोसले उर्फ निंगऱ्या,वय.४२ वर्ष (रा.राजीव गांधी झोपडपट्टी,ता.कर्जत,जि.अहमदनगर ) याला ताब्यात घेतले असून,त्याच्या ताब्यातील ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांपासुन घरफोडीचे प्रमाण वाढले होते,याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावुन सक्त नाईट राउंड,कोंबिंग ऑपरेशन तसेच गुन्हेगार चेक करणे,गुन्हा घडले ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज याबबतीत लक्ष केंद्रीत करून मिळवण्याबाबत मार्गदर्शन केले असता,गुन्हे शोध पथकाने घरफोडी घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत,या आधारे बातमीदारामार्फत बातमी मिळविण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश आले.
सीसीटिव्ही फुटेज मधील आरोपी हा निंग-या उर्फ संजय देविदास भोसले याला ताब्यात घेतले असता,त्याची चौकशी केली असता त्याने बारामती परिसरासह आणखी दोन साथीदारासह ९ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.या घरफोडीत चोरी केलेल्या मुद्देमालापैकी सोने,चांदीचे दागिने,रोख रक्कम असा ५ लाखांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.ही कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे,नंदु जाधव,विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,चालक बापुराव गावडे,अनिकेत शेळके यांनी केली आहे.