सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,पी.डी.पाटील यांचा वारसा सांगत बाळासाहेब पाटील राज्याचे सहकारमंत्री झाले आणि स्वतः सहकारमंत्री राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणारे संरक्षण मिळत आहे की नाही हे बघणं ? आणि मिळत नसेल तर त्यांचं संरक्षण करणं ही रक्षकाची भूमिका बाळासाहेब पाटलांची असताना ते आज स्वतः भक्षकासारखं वागत आहेत.सहकारमंत्री म्हणत आहे की, एका टप्प्यात एफआरपी देणे शक्य नाही यावर बाळासाहेब पाटलांना टोला मारत तुम्ही राज्याचे सहकारमंत्री आहेत का ? सह्याद्रीचे चेअरमन ? आहेत हे आधी स्पष्ट करा.
तुम्हाला राज्याचे सहकारमंत्री म्हणून कायद्यामध्ये तरतूद आहे त्याची अंमलबजावणी करणे हे तुमचे कर्तव्य आहे असे असताना तुम्ही कारखान्याचे चेअरमन नंतर हात आहे राज्याचे सहकार मंत्री या कर्तव्याची जाणीव आम्ही करून द्यावी अशातला भाग नाही.आज साताऱ्यामध्ये ऊस दरासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती मात्र,ती बैठक बरखास्त झाली यामागे देखील बाळासाहेबांचा हात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.आघाडी सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे,असा घणाघाती आरोप देखील मा.खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर केला.