फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करून वसुलीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खाजगी सावकार उमेश नरसिंग पवार (रा.सुरवडी,ता.फलटण,जि.सातारा) याच्याविरुद्ध भादवी कलम ४५२,५०४,५०६, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४२,४५ अनव्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी पंकज भीमराव वाघमारे,वय.३६ (रा.७ सर्कल,साखरवाडी,ता. फलटण,जि. सातारा)यांनी उमेश नरसिंग पवार (रा.सूरवडी,ता.फलटण जि.सातारा )याच्या विरोधात खाजगी सावकारी प्रकरणी तक्रार दिली असून,उमेश पवार यांनी पंकज वाघमारे यांना पत्नीच्या औषधोपचारासाठी ८० हजार रुपये दिले होते.
फिर्यादी यांनी आरोपीस आतापर्यंत तब्बल दोन लाख वीस हजार रोख आणि गुगल पे अँपवरून सुमारे ९७ हजार ७०० रुपये असे मिळून सुमारे ३ लाख २० हजार रुपये दिले आहेत. तरीसुद्धा उमेश पवार यांनी वाघमारे यांच्या बोलेरो गाडीचे आरसी पुस्तक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया फलटण शाखेचे खाते नंबर भरलेले धनादेश सह्या करून जबरदस्तीने घेतलेले आहेत.तो परत करणार नसून, बोलेरो कार नावावर करून दे म्हणून फिर्यादी आणि त्याच्या पत्नीस राहते घरी दे जबरदस्तीने घुसून,वारंवार अपशब्द बोलून, शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक फौजदार यादव करित आहेत.