बारामतीत क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीने सुरू केला “फाउंडेशन प्लस स्कूल” युनिक प्रोग्रॅम…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (संपादक विकास कोकरे )

बारामतीत क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीने आता फाउंडेशन प्लस स्कूल हा युनिक प्रोग्रॅम सुरू केला आहे.हा प्रोग्रॅम आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप महत्त्वाचा असणारा आहे.या प्रोग्रॅममधील विद्यार्थ्यांना सकाळी फाउंडेशन शिकवलं जाते.त्यानंतर दुपारी एक ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेमधील रेग्युलर पोर्शन मधील अभ्यासक्रम शिकवला जातो आणि यालाच “फाउंडेशन प्लस स्कूल” असे म्हटले जाते.बारामती शहरातील विद्यार्थ्यांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.फाउंडेशन प्लस स्कूल असा प्रोग्रॅम आता बारामतीत सुरू करण्यात आलेला आहे.यामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.

ज्या मुलांना आठवीला प्रवेश घ्यायची त्यांना सुरुवातीला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर भर दिला जातो.त्यानंतर नववी व दहावीला फाउंडेशन स्कूल लॉन्च केलं.ज्या मुला-मुलींना अकरावीमध्ये फाउंडेशन प्लस स्कूलला येता आले नाही त्यांना दहावीची परीक्षा झाल्यावर दिड महिन्यात ट्रेन करून त्यांचा फाउंडेशन कोर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.सध्या स्पर्धेचे युग आहे,आणि या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी आप आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडत असतात.आणि याच वेळी प्रत्येक वेळी प्रयत्न करणारा प्रत्येकच विद्यार्थी यशस्वी होतोच असं नाही,कारण अनेकवेळा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा दाखवणारे शिक्षक मिळत नाहीत.

मात्र बारामतीच्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीने या गोष्टी बदलून दाखवण्याचे काम करुन दाखवलं आहे.कारण क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांकडून (JEE,JEE MAINS, NEET MHTCET) यांसारख्या स्पर्धात्मक कोर्सची तयारी करून घेतली जाते.विद्यार्थ्यांना केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये यश प्राप्त झाले आहे.या अकॅडमी मध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.या ऍकॅडमी मध्ये तज्ञ आणि प्रशिक्षित स्टाफ असल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या लगेच सोडवल्या जातात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *