माई फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने कै.बाजीराव काळे नगरामध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (उपसंपादक : सुरज सवाणे )

कोरोना सारख्या संसर्गजन्य व्हायरसने जगभरात थैमान घातले असून,कोरोना काळात जगभरात रक्ताचा देखील तुटवडा भासत आहे,आणि कोरोनाच्या या संसर्गजन्य रोगाच्या काळातही माई फाऊंडेशन ट्रस्ट व समस्त काळे परिवाराच्या वतीने कै.बाजीराव काळे नगरात कोरोनाचे सरकारी नियम पाळत रक्तदान शिबिर संपन्न झाले.यामुळे कोरोना काळात समाजाच्या आरोग्य सेवेसाठी माई फौंडेशन ट्रस्टच्या वतीने काम करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे.हे लक्षात घेऊन माई फाऊंडेशनने रक्तदान शिबिर घेण्याचे संपन्न करण्याचे ठरविले.

सध्या बारामतीमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे,यामुळे गरजूंना रक्ताची गरज भासल्यास बाहेरगावी जावे लागते यामुळे हीच नागरिकांची गरज ओळखून माई
फाऊंडेशनच्या व काळे मित्र परिवाराच्या १०० पेक्षा जास्त युवा शिलेदारांनी आज रक्तदान केले.यावेळी रक्तदात्यांना रियल मी कंपनीचा ब्लु टूथ हेडसेट गिफ्ट देण्यात आले.माई फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. वैभव काळे व सचिव ऍड.रियाज खान हे गेल्या चार वर्षापासून माई फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून,माई फौंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना लॉकडॉऊन मध्ये ब्लँकेट वाटप केले गेले.

या फौंडेशनच्या माध्यमातून काही गोरगरीब कुटुंबांना देखील दत्तक घेतले आहे.तसेच माई फाउंडेशनच्या माध्यमातून आज कै.बाजीराव काळे नगरांमध्ये रक्तदान शिबिर पार पडले,या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल ११६ बाटल्यांचे रक्त संकलन झाले असल्याची माहिती माई फाऊंडेशनचे सचिव रियाज खान यांनी दिली.यावेळी माई फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड.वैभव काळे,सचिव रियाज खान,व तुषार काळे तसेच समस्त काळे परिवारांच्या युवा शिलेदार व मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *