“शोध दैनंदिन आनंदी जीवनाचा” कार्यशाळा संपन्न…


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

१० ऑक्टोबर हा दिवस जगभरात “जागतिक मानसिक आरोग्य दिन” म्हणुन साजरा केला जातो.आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचे दैनंदिन जीवन फारच त्रासदायक आहे. तो शारीरीक, मानसिकदृष्टया त्रस्त आहे, त्याच्या आयुष्यातील आनंद हरवत चालला आहे, यामुळे अकालिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी माणसाचे मानसिक आयुष्य सुदृढ असणे खुप गरजेचे आहे. या दिवसाचे औचित्य साधुन खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, शिक्षण विकास मंच, आणि महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “शोध आनंदी जीवनाचा” कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक : १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी दु. २:०० ते सायं. ६:३० पर्यंत स्थळ रंगस्वर सभागृह, ४ था मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.कोरोना परिस्थितीमुळे जे लोक उपस्थित राहू शकत नव्हते त्यांच्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा या दृष्टिने ही शाळा त्याचवेळी Facebook Live वर सुरु होती.या कार्यशाळेत “शोध आनंदी जीवनाचा” या विषयाला अनुसरुन पुढिल तक्त्याप्रमाणे तज्ज्ञ व्यक्तींनी विविध विषयांची मांडणी केली.

१) शोध दैनंदिन आनंदी जीवनाचा- मा. डॉ. मनोज भाटवडेकर २) बालपण आणि आनंद- मा. डॉ. समीर दलवाई ३) आनंदी शिक्षणासाठी उपयुक्त अभ्यासक्रम – मा.आरती सवुर ४)विशेष गरजा असलेल्या मुलांच्या जीवनातील आनंद- मा.डॉ. कल्याणी मांडके ५) वय वर्ष ६० नंतर आनंदी आयुष्यासाठी वाटचाल- मा.डॉ. अंजली छाब्रिया ७) स्त्री मन आणि मानसिक आरोग्य – मा.डॉ.अनुराधा सोवानी ७) तृतीयपंथी आणि त्यांचे मन- प्रिया पाटील ८) मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्य बळाची गरज – मा. प्रा. चेतन दिवाण 9) मनोगत – मा.डॉ. साधना तायडे (संचालक- आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई)
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे सुप्रिया सुळे,धनंजय मुंडे (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य) राजेश टोपे (आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य),नितीन पाटील (आयुक्त मानव विकास, औरंगाबाद), ओमप्रकाश देशमुख (आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे) डॉ.साधना तायडे, संचालक ०१ (आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ समीर दलवाई, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, डॉ.माधव सुर्यवंशी, अभिजीत राऊत, दिपिका शेरखाने ( समन्वयक अपंग हकक विकास मंच), सुकेशनी मर्चडे यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *