बारामतीत भारतीय युवा पँथरचे स्ट्रीट लाईटवरील केबल काढून,केबल मालकावर कारवाईसाठी बेमुदत धरणे आंदोलन…!!


कोणताही कर नसताना ह्या केबल,का काढल्या जात नाही ?भारतीय युवा पँथरचा सवाल..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्त्यांवरील स्ट्रीटलाइटच्या (पथदीवे)वरून विनापरवाना केबलच्या वायर आहेत.सदर वायर टाकल्यामुळे नगरपालिकेला कोणतेही भाडे मिळत नाही,तसेच कोणतेही भाडे जर नगरपरिषदेला मिळत नसेल तर ह्या केबल मालकांवर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.बारामती नगरपरिषदेने केबल मालकांना केवळ नोटीस दिल्या आहेत,परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.याबाबत भारतीय युवा पँथर चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शुभम गायकवाड यांनी या बेकायदेशीर केबलबाबत माहिती अधिकार कायदा २००५ प्रमाणे माहिती मागीवली होती.

यामध्ये नगरपरिषदेने दिलेल्या महितीमधून धक्कादायक बाबी समोर आल्या असून,स्ट्रीट लाईट वरील केबल वरून जर नगरपरिषदेला कर मिळत नसेल तर,बारामती नगरपरिषद केबल मालकांवर कारवाई का करत नाही ? की केबल चालकांशी काही आर्थिक तडजोडी करण्याचा प्रयत्न नगरपरिषद करीत आहे का ? असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांकडून उपस्थितीत केला जात आहे.यामुळे भारतीय युवा पँथरच्या मागणीनुसार स्ट्रीट लाईटच्या पोलवरून केबल ह्या तात्काळ काढून टाकाव्यात व केबल मालकांवर दंडात्मक कारवाई करावी,अन्यथा येत्या आठ दिवसांत यावर काही कारवाई झाली नाही,तर बारामती नगर परिषदेसमोर भारतीय युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती भारतीय युवा पँथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *