महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे स्वतःच्या घराला आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखा गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडी सरकारवर घणाघात..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लखीमपूरमध्ये शेकऱ्यांवर जो हल्ला झाला,त्या घटनेबद्दल आम्हाला संपूर्ण सहानुभूती आणि सहवेदना आहे.म्हणून याचा तपास मा.सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे क्षमतापूर्ण नेते आहेत.ते निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करतील. परंतु शिवसेनेचे संजय राऊत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दलच्या ओल्या दुष्काळावरती काहीच बोलत नाहीत.ज्या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावरती आला आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे मदत करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावरती देखील पोहचले नसल्याचा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकरांनी संजय राऊत यांच्यावर केला.

शेतकऱ्यांना फक्त पंचनाम्याच्या खाबुगिरीमध्ये अडकून ठेवलेला महाविकास आघाडी सरकारने केला आहे आणि आज तेच महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र बंदच्या कांगावा म्हणजे स्वतःच्या घराला आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखा आहे.असा टोला देखील पडळकरांनी महाविकास आघाडीला लगावला.महाविकास आघाडीच खरं दुःख हे काकाजींच्यासाठी सतावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील सहकारातील प्रस्थापितांची कीड साफ करण्याचे ठरविले आहे,आणि ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले,कारखाने कवडीमोल दराने गिळंकृत केले अशा सगळ्यांचा फास आवळत आहेत.यामुळेच महाविकास आघाडी सरकारचे पित्त खवळले आहे.आणि आज याचमुळे त्यांनी महाराष्ट्र बंदचा देखावा केला असल्याचा आरोप देखील पडळकरांनी या तिघाडी सरकारवर केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *