बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
माळेगाव पोलिसांना नियंत्रण कक्षामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हातील आरोपी हे अपहृत व्यक्तीसह XUV गाडी नं. MH.14 DN 0126 या गाडीसह माळेगाव बुद्रुकच्या दिशेने येत आहेत,ही माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला,शोध सुरू असतानाच खंडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेथे आल्याने त्यांच्याकडून आरोपींबाबत माहिती विचारली असता,आरोपी हे माळेगाव येथील राहणार असल्याचे समजले.
चार आरोपीस अपहृत व्यक्तीसह माळेगाव येथून ताब्यात घेत, अपहृत व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे.हे आरोपी व अपहृत व्यक्तीस खंडाळा पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पांगारे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.ही कामगीरी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे,अंमलदार चांदणे,पोलीस कर्मचारी प्रशांत राऊत,दीपक दराडे यांनी केली आहे.