बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहे बारामती मधील विद्या प्रतिष्ठान येथे डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटपाचा कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते पार पडला,यावेळी अजित पवार बोलत होते.राहत्या घराशेजारील मोकळ्या जागेच्या व शेतीच्या वादातून शेजाऱ्यांसह कुटुंबातील नातेवाईकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होत असून,पुढे अनेक जण या वादामुळे पिढ्यान् पिढ्या एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. याचे वाईट वाटते.अशा वादातून अखेर कोर्टाची पायरी चढली जाते.कोर्टात गेल्यानंतर वकील एका गटाला तुमच्याच बाजूने निकाल लागेल,असे सांगतात. तर दुसऱ्या गटालाही १०० टक्के तुमच्याच बाजूने निकाल लागेल, असे सांगतात.वकील हे त्यांचे काम करत असतात.त्यामुळे कधीच कोर्टाची पायरी चढू नये.
ते खरंही आहे.त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की मेहरबानी करून कोर्टाची पायरी चढू नका’, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊ साहेबांचाचा थाट असायचा.त्यावेळी काही भाऊसाहेबांनी कुणाच्याही
जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केले. त्याकाळी भाऊ साहेबांचा मोठा दरारा असायचा. पुढे काळ बदलत गेला.नवनवी आव्हाने समोर आली.आता सर्वत्र संगणकीकरण मोठ्या प्रमाणात झाले.तसेच कामात सुलभता आणण्याचा वेळेची बचत करण्याचा व हेलपाटे मारु लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत’ असेही अजित पवारांनी म्हटले.