वाहतूक पोलीस कुलकर्णी याच्यावर कारवाईची मागणी…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती शहरात पोलीस आणि वकील आमने सामने आल्याची घटना घडली असून,एक वकिलाने आपल्या भाजल्याने मुलाला दवाखान्यात घेऊन जात असताना,बारामती शहरातील वाहतूक पोलिसांनी थांबवले.संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले की,माझा मुलगा आजारी असल्याने दवाखान्यात लवकर घेऊन जायचे आहे असे,सांगितले असता,पोलीस शिपाई कुलकर्णी याने मास्क न घातल्याची पावती करण्यास सांगितले असता,या वकिलाने देखील मास्क नसल्याने पावती फाडली,परंतु आपल्यासमोर इतर चार ते पाच लोकांनीही मास्क न घातल्याचे दाखवून दिले असता,जशी माझ्यावर कारवाई होते तर ह्या विनामास्क जात असलेल्या लोकांवर कारवाई होत नाही ? अशी विचारणा केली असता पोलिस कर्मचारी कुलकर्णी यांनी वकिलांचे गचुरे धरत,आम्हाला कायदा शिकवतो काय ?
असे म्हणत त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवले,तुला आता जेलमध्येच बसवतो मग तुला कायदा कळेल अशी धमकी दिली.अशी तक्रार या वकिलाने दिली आहे.या घटनेनंतर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत,पोलिसांनी धमकावल्याची वकिलांची तक्रार होती,तर वकिलास मास्क नसल्याने पोलिसांनी कारवाई केली असे पोलिसांकडून सांगण्यात आले.बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सोकटे यांनी यासंदर्भात माहिती दिली.पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की,बारामती न्यायालयात वकिली करणाऱ्या अतुल भोपळे या वकिलांबरोबर हा प्रकार घडला असून,या वकिलांच्या मुलाला भाजले असल्याने आपल्या मुलाला घेऊन तातडीने मोटारीतून दवाखान्यात निघालेल्या वकिलांना शहरातील भिगवण चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले.विनामास्क असल्याने कारवाई करावी लागेल असे सांगितल्यानंतर वकिलाने पावती फाडली. यावेळी इतरही काही लोक विना मस्त जात आहेत तरीदेखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही ?
अशी विचारणा वकिलांनी केली असता वाहतूक पोलिस कर्मचारी कुलकर्णी याने आपली गचांडी धरली व पोलीस वाहनात नेऊन बसवले अशी तक्रार या वकिलांनी केली यासंदर्भात पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे देखील वकिलाने तक्रार केली असल्याचे वकिल संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सोकटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. घडलेल्या प्रकारानंतर यांना याची माहिती मिळताच बारामती वकील संघटनेचे पदाधिकारी शहर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी वाहतूक पोलिस कर्मचारी कुलकर्णी यांच्यावरती कारवाईचा आग्रह धरला,त्यानंतर मात्र पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देत पोलिसांची वकिलांबाबत होत असलेल्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली.