बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
केंद्रात असणा-या भाजपा सरकारच्या कामगार,कष्टकरी,
शेतकरी व सामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात असणाऱ्या धोरणांच्या विरोधात तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी औदयोगिक बंदमध्ये बारामती एमआयडीसी व कंपनीतील कामगार संघटना व सर्व कामगार यांनी सहभाग घेतला आहे. केंद्रातील असणा-या भाजपा सरकारने देशात कामगार कायद्यामध्ये अत्यंत भयानक असे कामगार विरोधी बदल केलेले असून कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली असून, कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन संरक्षण,विमा व बॅकासारख्या मुलभूत सार्वजनीक क्षेत्रातील उपकम देखील विकण्याच्या हालचाली सुरू आहेत.सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे.कोरोना काळात कोटयावधी लोकांचा रोजगार गेलेला आहे. अतिवृष्टी,कमी पर्जन्यमान,शेतमालाला कवडीमोल भावामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला असताना त्यांना तात्काळ साहय देण्यात यावे.तसेच शेतक-यांना बडया जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे तीन काळे कायदे रद्द करावेत.देशव्यापी औदयोगीक बंद होत असून या सर्व मागण्या कामगार, शेतकरी,कष्टकरी व सामान्य जनता यांच्या हिताच्या आहेत.
प्रमुख मागण्या :
१ .केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन अन्यायकारक कार्पोरेट धामणे शेतीविषयक काळे कायदे तात्काळ रदद व्हावेत आणि एमएसपीचा नवा कायदा तयार करण्यात यावा .
२. शेतक-यांना उत्पादन खर्चाचा विचार करून किमान हमी भाव देणारा कायदा करा .
३. केंद्र सरकारने नुकतेच केलेल्या कामगार कायद्यांमधील कामगार विरोधी बदलाच्या ४ श्रमसंहिता रदद करा.कामगार
कायदयांमध्ये बदल करण्यासाठी सर्व कामगार संघटनांशी खुला विचार विनिमय करा.
४ . प्रचलित कामगार कायदयांची अंमलबजावणी करा.व भ्रष्ट अधिका-यांविरोधात कडक कारवाई करा.
५ .कोरोना काळात रोजगार गमावलेल्या असंघटीत कामगार व व्यवसायिकांना केंद्राकडून प्रतिमहा रू.७५०० सहाय्य द्या.
६ .महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाय योजना करा.
७. खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रथा तात्काळ बंद करा . कंत्राटी कामगारांना आस्थापनांच्या कायम सेवेत घ्या .
८.बॅका,संरक्षण,आरोग्य,शिक्षण, विमा,पोस्ट,बीएसएनएल,रेल्वे, पेट्रोलियम,हवाई वाहतूक,बंदरे, कोळसा,वीज व राज्य परिवहन इत्यादी क्षेत्रातील संस्थांचे कोणत्याही मार्गाने होणारे खाजगीकरण तात्काळ रदद करा.
९. घर कामगार,विडी कामगार, रिक्षावाले, पथारीवाले, अंग मेहनीत मजूर, वाधकाम कामगार, गरीब शेतकरी,शेतमजूर व असंघटीत कामगारांसाठी पेन्शन, मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना व
यंत्रणा निर्माण करून त्यासाठी पुरेसी अंदाजपत्रकीय तरतूद करा.
१०. पेट्रोल,डीझेल, गॅस,खादयतेल व जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ कमी करा .
या मागण्यांसाठी देशव्यापी भारत बंदमध्ये बारामती एमआयडीसी मधील कामगार संघटनांनी भाग घेतला आणि त्यांनी निदर्शने केली.बारामतीतील ग्रीव्हज कॉटन अँड कंपनी एम्प्लॉईज युनियन, पियाजिओ व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेड,पुना एम्प्लॉइज युनियन,त्रयामुर्ती इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड बारामती व बेलमोन्ट स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर,भारतीय कामगार सेनेच्या सुयश ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी यामध्ये सहभाग घेतला.बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर कामगारांनी निदर्शने केली.यामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.यामध्ये तानाजी खराडे,सचिन चौधर या युज कॉटन अँड कंपनीच्या युनियनचे पदाधिकारी तसेच भारतीय कामगार सेनेचे पोपट घुले,भारत जाधव,सोमनाथ भोंग यांनी सहभाग घेतला होता.