माझ्या तालुक्यात अवैध धंदे नको, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पोलीस प्रशासनाला तंबी…!!


या तंबीनंतर तालुक्यातील अवैध धंदे बंद होणार का ??

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यातील कटफळ येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांकडून ड्रोन भूमापन सर्वेची माहिती घेत होते.यावेळी एका दारुड्याने या ठिकाणी एन्ट्री करत थेट अजित पवार यांचे पाय पकडले. लोक दुपारीच चंद्रावर जायला लागलेत,त्यामुळे माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत अशी तंबी पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली.ड्रोन भूमापन सची माहिती पवार हे अधिकाऱ्यांकडून घेत होते. यावेळी एक तरुण गर्दीतून वाट काढत डुलतच त्यांच्याकडे आला.त्यांच्या पायाही पडला. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी त्याला बाजूला केले.बोल बाबा, आज काय दुपारीच चंद्रावर.. काय चाललेय काय..अरे आज शनिवार आहे’असे म्हटले
अशी विचारणा पवार यांनी केली.

त्यानंतर भाषणादरम्यान गावातील एका कार्यकर्त्याने, ‘दादा, गावात दारू धंदे आहेत.दारुड्यांमुळे गावात त्रास होत असल्याने दादा दारुधंदे बंद करायला पोलिसांना सांगा,अशी मागणी खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने केली.त्यावर पवार यांनी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आहेत का दौऱ्यात अशी विचारणा केली.काही काही जण व्यसनाधीन झाल्यावर पुढे त्रास होतो.त्यांना व्यसनापासून बाजूला करण्याचे काम आपण सगळ्यांनी केले पाहिजे असे सांगत माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत,अशा धंद्यांवर कारवाई करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.आता अजित पवार यांच्या तंबीनंतर तरी बारामती तालुक्यातील अवैध धंदे बंद होतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *